गणेश चतुर्थीच्या दिवशी दहशतवादी कट उधळला, उत्तर प्रदेशात एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कानपूर

उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने हिजबूल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कानपूरमध्ये कमर-उज-जमां या मूळचा आसाममधील असलेला रहिवासी हा हिजबुल मुजाहिदिनीसाठी काम करत होता. गणेश चतुर्थीच्याच दिवशी  तो एक दहशतवादी हल्ला करणार होता, त्यासाठी त्याने एका मंदिराची रेकीही केली होती. त्याचा मनसुबा पूर्ण होण्याच्या आतच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

दहशतवादी जमांने 2017 मध्ये ओसामा नावाच्या व्यक्तीसह कश्मीरच्या किश्तवाडीतील जंगलात दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते. एप्रिल मध्ये त्याने AK-47 सह असलेला एक फोटो सोशल मिडियावर टाकला होता. त्यानंतर पोलिसांनी जमांचा शोध घेण्यास सुरूवात केली. जमां कानपूरमध्ये कधी दाखला झाला, त्याच्या बरोबर किती माणसे होती, कोण कोणत्या जागा निशाण्यावर होत्या अशी सर्व माहिती काढण्यासाठी पोलिसांनी त्याची कसून चौकशी करण्यास सुरूवात केली आहे.  दहशतवादी जमांकडे फक्त मोबाईल सापडला असून त्यातून सर्व कॉन्टॅक्ट नंबर आणि कॉल हिस्ट्री तपासली जात आहे.