नाकात ऑक्सिजनची नळी घालून दिली 10 वीची परीक्षा, मिळाले 69 टक्के

560

उत्तर प्रदेशमध्ये एका मुलीची तब्येत ठीक नव्हती. असे असताना ऑक्सिजन सिलिंडर घेऊन, नाकात नळी घालून या मुलीने दहावीची परीक्षा दिली. निकाल आल्यानंतर कळाले की तिला 69 टक्के मिळाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये राहणारी साफियाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

साफिया जावेद ही 16 वर्षाची मुलगी बरेलीमध्ये राहते. तिला फुफ्फुसांचा आजार आहे. म्हणून तिला ऑक्सिजन सिलिंडरद्वारे श्वास घेणे अनिवार्य आहे. आजारामुळे तिला शाळेत जाणे जमले नाही, म्हणून तिने घरीच अभ्यास केला होता. पण प्रश्न परीक्षेचा होता. घरच्यांशी भांडून ती दहावीच्या परीक्षेला बसली. यासाठी काही समाज सेवकांनी तिची मदत केली. काही समाज सेवकांनी शिक्षण विभागाचे संचालक प्रदीप कुमार यांची भेट घेतली आणि साफियाची अडचण सांगितली. नंतर कुमार यांनी साफियाचे परीक्षेचे केंद्र आहे तिकडे तत्काळ संपर्क साधून सर्व परवानगी घेतली. परीक्षेच्या वेळी साफियाला ऑक्सिजन सिलिंडर घेऊन परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली.

शनिवारी उत्तर प्रदेशमधील 10 वी 12 वीच्या परीक्षांचे निकाल लागले. त्यात साफियाला 69 टक्के गुण मिळाले. यामुळे साफिया आणि तिचे कुटुंबीय आनंदात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या