शरीरसंबंधास नकार दिल्याने माथेफिरु नवऱ्याने छतावरुन ढकलले

नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या नवऱ्याने पत्नीला छतावरून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. शेजाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले आहे. तर घटनेनंतर महिलेच्या पतीने पोबारा केला आहे.

मुकेश अहिरवार असे आरोपी पतीचे नाव असून तीजा हे पीडित महिलेचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील झाशीतील मऊरानीपूरमध्ये मुकेश आणि तीजा राहत होते. दोघांचा प्रेमविवाह होता. 2022 मध्ये दोघांचे लग्न झाले. मात्र, लग्नाच्या काही महिन्यानंतर दोघांमध्ये सतत खटके उडत होते. त्यानंतर मुकेशने घटनेच्या आदल्या दिवशी तिच्यावर जबरदस्ती केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यावेळी संतप्त मुकेशने तिला मारहाण केली आणि घराच्या छतावरून खाली फेकले. तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तीजाच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

तिजाने सांगितेले की, माझा नवरा शरीरसंबंधासाठी जबरदस्ती करत होता. नकार दिल्याने त्याने छतावरून ढकलले. मला जगायचे आणि त्याला दाखवायचेय की त्याने माझ्यासोबत काय केले ते.