चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पोलीस ठाण्यात जाऊन दिली गुन्ह्याची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

उत्तर प्रदेशातील बांदामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केली. त्यानंतर तिचे छाटलेले मस्तक पोलीस ठाण्यात नेले. ते मस्तक पोलिसांना दाखवत आपण आपल्या पत्नीची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पत्नीचे छाटलेले मस्तक पोलीस ठाण्यात नेतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

चिन्नर यादव पत्नी विमलासोबत(वय 35) नेतानगर परिसरात राहत होता. चिन्नरला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. या विषयावरून शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात चिन्नरने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर तिचे मसत्क छाटले आणि ते घेऊन तो बाबेरू पोलीस ठाण्यात दाखल झाला. आपण पत्नीची हत्या केल्याचे सांगत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र प्रतापसिंह चौहान यांनी दिली. यादव याने हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. विमला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.