UP – पिलीभीत येथे बस-बोलेरोची भीषण टक्कर, 9 जणांचा मृत्यू; 30 जखमी

उत्तर प्रदेशमधील पिलीभीत जिल्ह्यातील पुरणपूर येथे शनिवारी बोलेरो जीप आणि बसमध्ये भीषण टक्कर झाली. यात 9 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पिलीभीतचे पोलीस अधीक्षक जयप्रकाश यादव यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने बचवकार्याला वेग आला.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेवर दुःख व्यक्त केले असून मृतांचा नातेवाईकांना प्रत्येक 5-5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींची यादी बनवण्यास सांगितले आहे.

या दुर्घटनेबाबत पोलीस अधीक्षक जयप्रकाश यादव यांनी माहिती देताना सांगितले की, शनिवारी पुरणपूर पोलीस स्थानक भागात बस आणि बोलेरो कारची जोरदार धडक झाली. यामुळे बसने पलटी मारली तर, बोलेरो जीपचा चुराडा झाला. अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, तर 30 जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांनी रुग्णालयात उपचार उपचार सुरू असताना जीव सोडला.

आपली प्रतिक्रिया द्या