उन्नावमध्ये बलात्कार पीडितेचा पोलीस कार्यालयासमोर आत्मदहनचा प्रयत्न

436
fire

हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरण, उन्नावमध्ये बलात्कार व हत्या प्रकरण ताजे असतानाच उन्नावमध्येच एका बलात्कार पीडित तरुणीने (25) पोलीस कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या या पीडितेने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. पण पोलिसांनी तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

पीडित महिलेचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष देऊन त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. पण नंतर मात्र तो तिला टाळू लागला. यामुळे तरुणीने 2 ऑक्टोबर रोजी त्याच्या विरोधात हसनगंज पोलिसात फसवणूकीची व लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने त्याला जामिन मंजूर केला. यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी टि्वटरवर माहिती दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या