
सामना प्रतिनिधी । मुंबई
हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी पटकथा आणि संवाद लिहिणारे उपेंद्र सिधये ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
उपेंद्र सिधये यांनी ‘मुंबई मेरी जान’पासून आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात करत, ‘दृष्यम’, ‘किल्ला’, ‘मांजा’ अशा लोकप्रिय आणि विविध धाटणीच्या चित्रपटांसाठी पटकथा व संवाद लेखन केले. या चित्रपटात गर्लफ्रेंड शोधणार्या मुलाच्या भूमिकेसाठी अमेय वाघचे नाव निश्चित झाले होते, नंतर अलिशा या गर्लफ्रेंडचे पात्र साकारण्यासाठी सई ताम्हणकर हिचे नाव निश्चित करण्यात आले. हा चित्रपट येत्या 26 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

























































