
शिष्यवृत्ती, प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि मार्गदर्शनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 500 दशलक्ष रुपयांच्या निधीसह अपग्रॅड फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. ‘‘दीर्घकाळापर्यंत शिक्षण, अपस्किलिंग व करीअर विकास हे फक्त परवडू शकणाऱ्यांचाच अधिकार असू शकत नाहीत. ऑनलाइन शिक्षणाने जगभरातील सर्व श्रमजीवी व्यावसायिकांचा दृष्टिकोन आणि ते करीअर सुधारणांकडे पाहत असलेल्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणला आहे. म्हणूनच अपग्रॅड फाउंडेशनचा किफायतशीरपणा, उपलब्ध होण्याजोगे व जागरुकतेच्या या थीमला वाढत्या महत्त्वाकांक्षा असलेल्यांपर्यंत घेऊन जाण्याचा मनसुबा असल्याचे अपग्रॅडचे अध्यक्ष व सहसंस्थापक रॉनी क्रूवाला म्हणाले.

























































