
मध्य रेल्वेने यूटीएस काउंटर आणि एटीव्हीएम वर POS, QR/UPI सुरू करून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे तिकिटासाठीचे पेमेंट करणे आता अधिक सोपे होणार आहे.
आता, एटीव्हीएम, यूटीएस/पीआरएस काउंटरमध्ये तिकिटांचे पेमेंट करण्यासाठी प्रवासी कोणतेही UPI सक्षम ॲप वापरू शकतात.
एटीव्हीएम स्मार्ट कार्ड आता नेट बँकिंग/यूपीआयच्या माध्यमातून ‘यूटीएस ऑन मोबाइल’ वेबसाइटद्वारे रिचार्ज केले जाऊ शकते. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.



























































