अमरावती जिल्ह्यातील पाणी व सिंचनाचा प्रश्न मिटला, अप्परवर्धाचे तीन दरवाजे उघडले

844

मध्यप्रदेशात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे अप्पर वर्धा धरण भरणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र अलिकडच्या काही दिवसात मध्यप्रदेशासोबतच विदर्भातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सोमवारी सकाळी अप्पर वर्धा धरण 100 टक्के पाण्याने भरले आहे. त्यामुळे अप्परवर्धा या धरणाचे तीन दरवाजे उघडून 50 घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

धरणातून विसर्ग सुरु असल्यामुळे वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात संततधार पाऊस पडल्यामुळे वर्धानदीला जोडणार्‍या नद्या व नाले भरुन वाहत आहेत. संततधार पावसामुळे कोणत्याही क्षणी वर्धा नदीला मोठा पूर येऊ शकतो म्हणून नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी उन्हाळ्यात अप्परवर्धा धरणात केवळ 11 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे पाऊस कमी पडल्यास अमरावती शहरावर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावण्याची भीती व्यक्त होत होती. त्याचप्रमाणे दरवर्षी धरणाच्या पाण्यातून अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात शेतीच्या सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो. धरण भरत नसल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच आता धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे सिंचनाचा सुध्दा प्रश्न मिटला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या