
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल आज जाहीर झाला आहे. कनिष्क कटारिया या परिक्षेत देशातून पहिला आला आहे. तर महाराष्ट्रातील सृष्टी जयंत देशमुख ही विद्यार्थीनी मुलींमध्ये पहिली तर देशात पाचवी आली आहे.
UPSC final exam results: Kanishak Kataria secures all India rank 1. AIR 5 Srushti Jayant Deshmukh topper among women. pic.twitter.com/CIhcMUEcXm
— ANI (@ANI) April 5, 2019
या परिक्षेत कनिष्क कटारियाने पहिला, अक्षत जैनने दुसरा, जुनैद अहमदने तिसरा, श्रवण कुमारने चौथा, सृष्टी देशमुखने पाचवा क्रमांक पटकावला आहे. ही परीक्षा दिलेले विद्यार्थी upsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.



























































