UPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल

78

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इरादा जर पक्का असेल तर कोणतेही व्यंग तुम्हाला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही हे 2014 ला इरा सिंघल हिने सिद्ध करून दाखवले होते. UPSC परीक्षेमध्ये इरा टॉपर आली होती. याच इराला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सोमवारी इराने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून या ट्रोलरची पोलखोल केली आहे.

भूपेश जसवाल नावाच्या एका अकाऊंटवरून इराच्या फोटोवर कुबडी अशी कमेंट करण्यात आली. तसेच तिला अपशब्दही वापरण्यात आले. याचा स्क्रीनशॉट शेअर करत इराने आपल्या भावना फेसबुकवर व्यक्त केल्या आहेत. ‘काही लोकांना वाटते की दिव्यांगांना काहीही सहन करावे लागत नाही. कारण जगातिल लोक त्यांच्याबाबत दयावान असतात. परंतु येथे मी इन्टाग्रामवरील कमेंटस शेअर करत आहे. यात एक व्यक्ती मला कुबडी म्हणत असून अपशब्दही वापरत आहे’, असे इराने म्हटले आहे. यासोबत या व्यक्तीला शासकीय सेवेत येण्याची इच्छा आहे, असाही चिमटा काढला आहे. तसेच आमल्याला अशा शाळा आणि कॉलेजची आवश्यकता आहे की जेथे तुम्हाला चांगला माणूस कसे बनावे याचे शिक्षण मिळेल, असेही ती म्हणते.

2014 मध्ये इराने युपीएससी परीक्षमध्ये टॉप केले होते. दिव्यांग असतानाही तिने सामान्य वर्गातून परीक्षा दिली होती आणि टॉपर राहिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या