
उरण तालुक्यातील मोठे भोम या गावातील नामदेव पाटील या सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या राजेश पाटील यांनी सुमारे 4 हजार विविध जातींच्या सरपटणाऱ्या प्राण्याना जिवदान देण्याचे काम केले आहे. तसेच सर्पदंश झालेल्या रुग्णांना स्वखर्चाने नवी मुंबईत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून मदतकार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल साई देवस्थानचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी घेऊन साई सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

राजेश पाटील यांना वयाच्या सोळाव्या वर्षी सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल स्नेह, जिवाळा निर्माण झाला. त्यातुनच राजेश पाटील यांनी उरण, नवी मुंबई परिसरातील लोकवस्तीत वावरणाऱ्या विविध जातींच्या वन्य प्राण्यांना पकडून सुरळीत ठिकाणी सोडण्याचे काम केले आहे. तसेच ज्या नागरीकांना सरपटणाऱ्या प्राण्यानी दंश केला. त्याना तात्काळ नवीमुंबई परिसरातील रुग्णालयात स्वखर्चाने नेण्याचे काम केले. तसेच त्यांचे प्राण वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयातील डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले आहेत.
या पृथ्वीतळावर सर्वांना वावरण्याचा अधिकार आहे.सरपटणारे प्राणी विशेष करुन साप हे विनाकारण कोणाला दंश करत नाहीत. उलट ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत. त्यामूळे विविध जातींच्या सरपटणाऱ्या प्राण्याना कोणी मारू नये. ज्या ज्या वस्तीत, परिसरात सरपटणारे प्राणी वावरत आहेत. त्याना पकडून सुरळीत ठिकाणी सोडण्याचे काम आम्ही करत असतो. आज जवळजवळ ४ हजारच्यावर विविध जातींच्या सरपटणाऱ्या प्राण्याना जिवदान देण्याचे काम केले आहे. भविष्यातही हे काम करणार आहे. तरी शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यांना कोणीही मारू नये. असं यावेळी राजेश पाटील म्हणाले आहेत.





























































