संचारबंदीतही 100 प्रवाशांची कंटेनरमध्ये वाहतूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

444
प्रातिनिधिक फोटो

लॉकडाऊन, संचारबंदीच्या आदेशानंतरही उरण ते उत्तर प्रदेश पर्यंत 100 प्रवाशांची कंटेनरमध्ये वाहतूक करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अब्दुल करुण गोस (50) रा.उत्तरप्रदेश या वाहनचालकावर उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वाहनचालक फरार झाला असून त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

पोलिस सूत्रांनुसार सोमवारी cकोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी संचारबंदीच्या आदेशानंतरही प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवासी वाहतूक करणाचा प्रयत्न उरण पोलिसांनी हाणून पाडला.या कारवाई दरम्यान वाहनचालक फरार झाला आहे.या प्रकरणी अवैध वाहतूक करु पाहाणाऱ्या अब्दुल करुण गोस यांच्यावर उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या