ट्रोलर्स मला छळत आहेत, पण आता माघार नाही!

urmila-matondakar-new-pic

सामना ऑनलाईन । मुंबई

मी लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवारी स्वीकारल्यापासून मोठ्या संख्येने ट्रोलर्स सोशल साइटस्वर भयानक मेसेज टाकून मला छळत आहेत. पण मीही कच्च्या गुरूची शिष्य नाही. ट्रोलर्सच्या धमक्या आणि शिवीगाळीला मी भीक घालणार नाही अथवा निवडणुकीचे मैदान सोडून पळूनही जाणार नाही असा इशारा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आणि बॉलीवूड तारका उर्मिला मातोंडकर यांनी ट्रोलर्सना दिला आहे.

माझी लढत भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी आहे. त्यामुळे माझ्यापुढील आव्हान बलाढय़ आहे याची जाण मला आहे. पण माझ्या पक्षाने मला दिलेली जबाबदारी मी कितीही संकटे आली, कष्ट झाले तरी पार पाडणारच आहे. टीकाकारांच्या टीकेला महत्त्वच न देता ‘आगे बढो’ या धोरणाने मी निवडणूक पार पडेपर्यंत वागणार आहे, असेही मातोंडकर यांनी स्पष्ट केले.