Lok Sabha 2019 काँग्रेस प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी उर्मिलाची पंतप्रधानांवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
urmila-matondkar

सामना ऑनलाईन । मुंबई

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले आहेत पण त्यांची धोरणं चांगली नाहीत. सध्या देशात धर्माचे राजकारण सुरू असल्याची टीका उर्मिलाने केली आहे.

‘मी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी फार वाचले आहे. माझे कुटुंब देखील काँग्रेस समर्थक आहे. सध्या देशात सगळीकडे द्वेष पसरत आहे. धर्माच्या नावाखाली लोकांची हत्या होत आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलीय. हा लोकशाही असलेला देश आहे. इथे लोकांना त्यांना हवे ते बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. पण सध्याची परिस्थिती तशी नाही’, अशी टीका तिने मोदींवर व भाजपवर केली आहे.