अभिनेत्री उर्मिला निंबाळकरला झाला पुत्ररत्नाचा लाभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध अभिनेत्री व युट्यूबर उर्मिला निंबाळकर हिला 3 ऑगस्ट रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. अगदी प्रसूतीच्या काही काळ आधीपर्यंत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहिलेल्या उर्मिलाने ‘माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झालीय’ असे सांगत तिच्या बाळाच्या जन्माची बातमी जाहीर केली.

वडिलांवर, भावावर, सासऱ्यांवर आणि सगळ्यात जास्त चुकलं म्हणजे नवरा सुकीर्त गुमास्तेवर अति प्रेम असलं की , रंगभुमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन हिरोची एन्ट्री होते. माझ्या आयुष्यात 3 ऑगस्टला सकाळी हिरोची एन्ट्री झालीय!’ अशी मजेशीर पोस्ट उर्मिलाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

उर्मिला ही गरोदर असल्याच्या पहिल्या दिवसापासून अॅक्टिव्ह होती. तिने सोशल मीडियावरून प्रेग्नेंन्सीमधले तिचे अनुभव शेअर केले. तिच्या बेबी बंम्पसोबतच्या फोटोशूट पासून ते तिच्या डोहाळे जेवणापर्यंत सर्वाचीच जोरदार चर्चा झाली.

उर्मिलाचे डोहाळे जेवण तिचा नववा महिना पूर्ण झाल्यानंतर झाले. पुण्यातील ढेपेवाडा येथे राजेशाही पद्धतीने हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला उर्मिलाने हिरव्या रंगाची नव्वारी नेसली होती. तर लाल रंगांच्या फुलांचे दागिने परिधान केले होते. तिच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ देखील जबरदस्त गाजला.