US Iran Conflict – युद्धाचा भडका उडणार! त्वरीत इराण सोडा, अमेरिकन दुतावासाची आपल्या नागरिकांना स्पष्ट सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराणमधील तणाव युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. अशातच अमेरिकन दुतावासाने आपल्या नागरिकांना त्वरीत तेहरान सोडण्याची सूचना केली आहे. अमेरिकन दुतावासाकडून यासंदर्भात आपल्या नागरिकांना अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. दुसरीकडे इराण सरकारने सुरक्षेत वाढ करत अनेक ठिकाणी रस्ते बंद केले आहेत. विमान प्रवासावरही मर्यादा आणण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीमुळे कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो, अशी चिन्हे आहेत.

युद्धाच्या शक्यतेने अमेरिकन दुतावासाने रस्ते, हवाई आणि जलमार्गांचा उपयोग करा. पण त्वरीत इराण सोडा, अशी सूचना केली आहे. जगभरातील अनेक एअरलाइन्स इराणला जाणारी विमानांची उड्डाणे मर्यादित करत आहेत. अनेक विमानांची उड्डाणेही रद्द केली आहेत. यामुळे नागरिकांनी तातडीने इराण सोडावं, असे अमेरिकन दुतावासाने आपल्या नागरिकांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे नागरिकांनी अमेरिकेच्या सरकारकडून मदतीची कुठलीही आपेक्षा करू नये. कुठल्याही मदती शिवाय लवकरात लवकर नागरिकांनी इराण सोडावं, असे अमेरिकन दुतावासाने म्हटले आहे. दुसरीकडे, इराणनेही अमेरिकेला इशारा दिला आहे. आम्हाला उकसवलं तर महागात पडेल. सन्मानाने चर्चेसाठी आहोत, असे इराणने म्हटले आहे.