Israel-Iran War – अमेरिकी सैन्याला हाकलून देण्याची हीच योग्य वेळ; इराणचे आखाती देशांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात युद्धविराम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युद्धविराम होण्याची चर्चा सुरू असताना युद्धाची तीव्रता वाढत आहे. इराण अरब देशांमधील अमेरिकी-इस्रायली तळांवर हल्ले करत आहे. तर अमेरिका आणि इस्रायल इराणवर तीव्र हल्ले करत आहेत. त्यातच आता इराणने आखाती देशांना बंधुभावाची आठवण करून देत अमेरिकेविरोधात एकवटण्याचे आवाहन केले आहे.

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात युद्धविराम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युद्धविराम होण्याची चर्चा सुरू असतानाही युद्धाची तीव्रता वाढताना दिसत आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अरब देशांना आवाहन करत अमेरिकी सैन्याला हाकलून देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे.

अराघची यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, इराण सौदी अरेबियाचा आदर करतो आणि त्याला आपला भाऊ मानतो. आमची कारवाई अशा शत्रू आक्रमणकर्त्यांविरुद्ध आहे जे अरब किंवा इराणी लोकांचा आदर करत नाहीत, आणि कोणतीही सुरक्षा देऊ शकत नाहीत. इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई दलांसोबत काय केले ते त्यांनी पाहावे. अराघची यांनी अरब देशांना सांगितले की, त्यांच्या देशातून अमेरिकन सैन्याला हाकलून देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी सर्वांना एकवटले पाहिजे आणि आपल्या शत्रूला आपल्या प्रदेशातून हाकलून लावले पाहिजे. तसेच त्यांनी आखाती देशांना बंधुभावाची आठवण करून दिली.