
अमेरीकेच्या एका 33 वर्षीय व्यक्तीने अनोखा शोध लावला आहे. कर्करोगाने आपला डोळा गमावलेल्या ब्रायन स्टेनली यांनी आपला कृत्रिम डोळा तयार केला आहे. इंजिनीअर असलेल्या स्टेनलीने कृत्रिम डोळ्याला पूर्णपणे काम करणारी लाईट बनवली आहे. गॅझेट गीक आणि इवेटरने इंस्टाग्रामवर आपला कृत्रिम डोळा दाखवत एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओमध्ये डोळ्यातून हेडलॅम्पसारखी लाईट दिसत आहे. त्यांनी स्वत: लाईट बंद करुन खोलीत डोळ्यातील लाईटचा डेमो दाखवला आहे. या व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून दोन दिवसात 1 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.
ब्रायन स्टेनली याला कर्करोगामुळे एका डोळा गमवावा लागला. अशामध्ये स्टेनलीने अनोखा प्रयोग केला. व्हिडीओमध्ये ब्रायन स्टेनलीने सांगितली की, टायटेनियम स्कल लॅम्प हा अंधारात अभ्यास करण्यासाठी एकदम योग्य आहे. विशेष म्हणजे हा गरम होत नाही आणि याची बॅटरी लाईफ 20 तासाची आहे. त्याच्या व्हिडीओला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच लाईक्स मिळाले आहेत. फक्त दोन दिवसात या व्हिडीओला 1 मिलीअन व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर वाचकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका युजरने लिहीलेय गजब, हे कमाल आहे. एका अन्य युजरने, तुम्ही तुमचे प्रकाश स्त्रोत होऊ शकता. अन्य एकाने लिहीले भावा, याने हॅलोवीन टर्मिनेटरला सहज हलवू शकतो, तर आणखी एका युजरने लिहीलेय मला माहित आहे प्रत्येकजण साय-फाय बाबत विचार करतोय, पण विचार करतोय कॅंपिंगसाठी किती सोपे होईल.
ही पहिली वेळ नाही की ब्रायन स्टेनलीने सायबोर्ग डोळा बनवला आहे. ज्यामध्ये ‘टर्मिनेटर’ सिनेमामध्ये अर्नोल्ड श्वार्जनेगरच्या कॅरेक्टरसारखी चमक होती. त्यांच्या म्हणण्यानुसार हा नवा रंग आहे आणि पावर स्टोनची आठवण करुन देतो.




























































