दिवसभर झोप काढा आणि पैसे कमवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही गाढ झोप काढा, आम्ही तुम्हाला पैसे देतो… अशी ऑफर कुणी दिली तर… काय विश्वास बसत नाही ना…. पण सध्या अशाच एका आगळ्यावेगळ्या ऑफरची चर्चा रंगलेय. न्यूयॉर्क येथील मॅटरस कंपनी अशा व्यक्तीच्या शोधात आहे, जी बेडवर पडल्या पडल्या गाढ झोपी जाईल. कंपनीला अशी माणसं हवी आहेत, जे झोप काढण्यात एकदम तरबेज असतील. या कामाचा मोबदलाही दिला जाणार आहे.

कंपनीच्या अपेक्षेनुसार इच्छुक उमेदवाराकडे चांगले स्लिपिंग स्कील आवश्यक आहे. निवड झालेल्या व्यक्तींना स्टोअरमध्ये झोपावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत झोप काढावी लागेल. जर त्यांना नीट झोप आली नाही तर ते अनुभव त्यांनी दुसऱ्यांसोबत शेअर करायचे.