
इस्रायल, अमेरिका आणि इराक संघर्ष आता अधिक तीव्र होत आहे. या दरम्यान कुवेतच्या हवाई हद्दीत अमेरिकेची तीन लढाऊ विमाने पाडण्यात आल्याचे वृत्त आले होते. त्यावर आता अमेरिकन सैन्याने माहिती दिली आहे. अमेरिकन सैन्याने सोमवारी अहवाल दिला की लढाऊ मोहिमेदरम्यान कुवेतने चुकून तीन अमेरिकन हवाई दलाची F-15E स्ट्राइक ईगल विमाने पाडली. अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत इराणी विमाने, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचे हल्ले होते. त्यावेळी चूकून कुवेतकडूनन आमची विमाने पाडण्यात आली.
इराणी हल्ल्यांदरम्यान कुवेतने चुकून तीन अमेरिकन F-15E स्ट्राइक ईगल विमान पाडले. सर्व सहा एअर क्रूंना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. F-15 हे एक लढाऊ विमान आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा खामेनी यांच्या मृत्यूनंतर मध्य पूर्वेतील तणाव तीव्र झाला आहे आणि दोन्ही बाजूंमधील संघर्ष तीव्र होत आहे.
सेंट्रल कमांडने म्हटले आहे की, अमेरिकन एअर फोर्सची लढाऊ विमाने कुवेती हवाई संरक्षण दलाने चुकून पाडली. त्यातील सर्व सहा एअर क्रू सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले, त्यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुवेतने या घटनेची कबुली दिली आहे आणि या मोहिमत पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकन सैन्याने कुवेती संरक्षण दलांचे आभार मानले आहेत.
कुवेतमध्ये पाडण्यात आलेल्या एफ-१५ लढाऊ विमानांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये विमान कोसळण्यापूर्वी पायलट बाहेर पडताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये जेट क्रॅश झाल्यानंतर स्थानिक आणि कुवेती अधिकाऱ्यांनी एका लढाऊ पायलटला वाचवताना दाखवले आहे. एफ-१५ विमान पाडण्याची घटना मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या वेळी घडली आहे. अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
























































