
नोव्हाक जोकोव्हिचच्या अनुपस्थितीत जेतेपदाचा प्रबळ असलेला दुसरा मानांकित स्पेनचा राफेल नदाल आणि अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्विऑनटेकने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. पुरुष एकेरीत कार्लोस अल्कराझ व आंद्रे रुबलेव्ह यांनी, तर महिला एकेरीत जेसिका पेगुला व पेट्रा क्विटोव्हा यांनीही विजय नोंदवले.विक्रमी 22 ग्रँड स्लॅम विजेत्या नदालने तिसऱया फेरीत फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केवर 6-0, 6-0, 7-5 अशी मात केली.



























































