अमेरिकेतील मशिदीबाहेर गोळीबार, पाच जणांचा मृत्यू; हल्लेखोराने स्वत:वरही झाडल्या गोळ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील सेंट डिएगो इस्लामिक सेंटर येथील एका मशिदीबाहेर दोन अल्पवयीन मुलांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी स्वत:वरही गोळीबार केला. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था FBI या प्रकरणाचा हेट क्राईम म्हणून तपास करत आहे.

सॅन डिएगो येथील मशिदीत नागरिक नमाज पठन करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज झाला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कारमधून आलेले दोन अल्पवयीन मुलं मशिदीवर अंदाधुंद गोळीबार करत होती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना कारमध्येच हल्लेखोरांचे मृतदेह आढळून आले.

सेंट डिएगो इस्लामिक सेंटर येथे एक शाळा देखील असून सुदैवाने तेथील एकाही मुलाला कोणतीही दुखापत झालेली नाही. या हल्ल्यातील हल्लेखोर हे 17 व 19 वर्षांचे असून त्यांनी स्वत:वर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला, असे एफबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.