अमेरिकेने बेडकापासून विकसित केला सजीव रोबोट

660

अमेरिकेच्या संशोधकांनी बेडकांच्या पेशींपासून एक सजीव रोबोट विकसित केला आहे. हा जगातला पहिला जिवंत रोबोट आहे. कॅन्सर सेल्स संपवण्यासाठी या रोबोचा उपयोग होऊ शकतो असा दावा संशोधकांनीकेला आहे.

या रोबोचा आकार एक मिमी इतका असणार आहे. हा रोबो मानवी शरीरात फिरू शकतो. तसेच एक आठवडा न खाता पिता जिवंत राहू शकतो. या रोबोचा उपयोग प्रामुख्याने मानवी शरीरातील कॅन्सर सेल्स नष्ट करण्यासाठी होऊ शकतो. तसेच समुद्रातील प्लास्टिक नष्ट करण्यासाठीही या रोबोचा उपयोग होऊ शकतो.

संशोधकांनी या रोबोचे नाव जेनोबोट्स असे ठेवले आहे. हा ना पारंपारिक पद्धतीचा रोबोट आहे ना नवीन प्रजाती आहे. ही एक सजीव मशीन असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या