
अमेरिकेच्या टॅरिफमुळे जघरात अशांतता आहे. तसेच अमेरिकेविरोधात अनेक देश एकत्र येत आहेत. टॅरिफमुळे जागतिक वातावरण बदलत असून जागतिक अर्थव्यवस्थाही संकटात आहे. अशावेळी अमेरिकेला मोठा झटका देणारा दावा Moody’s ने केला आहे. त्यामुळे जघभराच टॅरिफ बॉम्ब फोडणाऱ्या ट्रम्प यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. मूडीचने त्यांच्या ताज्या अहवालात इशारा दिला आहे की अमेरिका गंभीर मंदीच्या उंबरठ्यावर आहे आणि अमेरिकेच्या एक तृतीयांश अर्थव्यवस्थेला आधीच संकटाचा सामना करावा लागत आहे. मूडीज अॅनालिटिक्सचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मार्क झांडी यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे की, राज्यस्तरीय डेटा दर्शवित आहे की अमेरिकन अर्थव्यवस्था महामंदीच्या उंबरठ्यावर आहे. विश्लेषणाच्या आधारे, त्यांनी म्हटले आहे की परिस्थिती अशी आहे की अमेरिकेच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) सुमारे एक तृतीयांश वाटा असलेली राज्ये एकतर मंदीच्या विळख्यात आहेत किंवा त्यांनी मंदीचा धोका गाठला आहे.
ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिकेचा उत्पादन पीएमआय ४८.७ पर्यंत खाली आला आहे आणि कारखान्यांची स्थिती ‘अमेरिकेच्या महामंदी’च्या काळापेक्षाही वाईट असल्याचे सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, अमेरिका जगभरातील देशांवर टॅरिफ बॉम्ब फोडत असताना, ऑगस्टमध्ये अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्रात सलग सहाव्या महिन्यात मोठी घसरण झाली आहे. याचे कारण म्हणजे देशातील कारखान्यांना ट्रम्प प्रशासनाच्या आयात शुल्काचे दुष्परिणाम सहन करावे लागत आहेत. याचा अर्थ असा की हे टॅरिफ फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरत आहे हे स्पष्ट आहे. उत्पादकांनी टॅरिफ तणावादरम्यान सध्याचे व्यावसायिक वातावरण महामंदीपेक्षाही वाईट असल्याचे म्हटले आहे.




























































