
ऑलिम्पिक, जागतिक अन् इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणारा जमैकाचा वेगवान धावपटू युसेन बोल्ट याला कोरोनाची लागण झाली आहे. 21 ऑगस्टला जमैका येथे युसेन बोल्टने बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये सामाजिक अंतर या नियमाचे पालन करण्यात आले नाही तसेच मास्कही लावण्यात आले नव्हते. त्यामुळे कदाचीत युसेन बोल्टला कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Stay Safe my ppl pic.twitter.com/ebwJFF5Ka9
— Usain St. Leo Bolt (@usainbolt) August 24, 2020
युसेन बोल्टच्या बर्थ डे पार्टीमध्ये त्याच्या कुटुंबासह मित्रपरिवार व इंग्लंडमधील मँचेस्टर युनायटेड या क्लबचा फुटबॉलपटू रहीम स्टार्ंलग याचीही उपस्थिती होती. युसेन बोल्टची शनिवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. तिथपासून तो विलगीकरणात आहे. एका व्हिडीओद्वारे त्याने मित्रांनाही सुरक्षित राहण्याचा संदेश दिला होता.


























































