23 वर्षांनंतर पुन्हा वापरूया 1985चे कॅलेंडर तारीख वारांसहीत जसेच्या तसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
- ओंकार दाते, दाते पंचांगकर्ते

स्वानंद पाटील । परळी वैजनाथ

तुम्हाला माहीती आहे का की, यंदा तुम्ही वापरत असलेले कॅलेंडर २३ वर्षांपूर्वीचे जुने कॅलेंडर आहे. होय, 2019 या वर्षाचे कॅलेंडर 1985 च्या कॅलेंडरसारखेच जशाच तसे आहे. यामध्ये वर्षांचे वार आणि तारखा जशास तशा आहेत. अठराव्या शतकात एक वेळा, एकोणिसाव्या शतकात अकरा वेळा तर विसाव्या शतकातही अकरा वेळेस कॅलेंडर एकसारखे आले आहे. 2019 नंतर अकरा वर्षानंतर 2030 या वर्षाचे कॅलेंडर असणार आहे. सध्या सोशल माध्यमांचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. यामध्ये अनेक वेळा एकच माहिती आपल्यापर्यंत येत असते. याप्रमाणेच कॅलेंडरच्या पुनरावृत्तीचे फोटो व त्यासंदर्भातील विविध माहिती मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.

2019 प्रमाणे असलेले वर्षे (इसवी सन) -1895 , 1901, 1907,1918 , 1929 ,1935 ,1946 ,1957 ,1963 , 1974 ,1985 ,1991 ,2002 ,2013 , 2019 ,2030 ,2041 ,2047 ,2058 , 2069 ,2075 ,2086 ,2097.

यावर्षीचे कॅलेंडर हे ग्रेगरियन कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. सातच्या पाढ्यात यावर्षाची दिनदर्शिका आखली जाते. सात अंक केंद्रीत पद्धतीमुळे कॅलेंडरची पुनरावृत्ती शक्य असते. केवळ या वर्षीचे कॅलेंडर यापूर्वीच्या अनेक वेळेला एकसारखे असू शकते. हिंदू पंचागानुसार कालगणना व तिथीवर केंद्रीत असल्यामुळे पुनरावृत्ती होत नाही. परंतु ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये लिप वर्ष गृहीत धरून वर्षगणना करण्याची सात अंक केंद्रीत पद्धत असल्याने पुनरावृत्ती अनेक वेळा असू शकते. – ओंकार दाते, दाते पंचांगकर्ते