नोटा हाताळल्यावर हात सॅनिटायझरने स्वच्छ धुऊन घ्या! FDA च्या मार्गदर्शक सूचना जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे मुंबईसह राज्यात संपूर्ण लॉकडाऊन सुरु असला तरी जीवनावश्यक वस्तु व खाद्यपदार्थांची दुकाने, बँका सुरु आहेत. पण व्यावसायिक व दुकानदार आणि बँकांमधील कर्मचाऱयांनी कोणती काळजी घ्यावी याची मार्गदर्शक तत्वे राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने जारी केली आहेत. बँक कर्मचाऱयांनी व दुकानदारांनी नोटा हाताळल्यानंतर हात सॅनिटायझरने स्वच्छ धुवून घ्यावेत आणि अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थ हाताळण्यापूर्वी व अन्न पदार्थ हाताळल्यानंतर हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

खाद्यपदार्थांची विक्री व उत्पादन करणाऱयांसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांची यादी
– दुकानांच्या बाहेर रांगेत उभे राहाणाऱया ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर राखावे
– अन्नपदार्थ हाताळल्यानंतर त्या हातांनी चेहऱयाला स्पर्श करू नका
– दुकाने-आस्थापनांमध्ये स्वच्छता राखा
– मास्कचा वापर आवश्यक
– ग्राहकांसाठी हॅण्डसॅनिटायझरची व्यवस्था करा
– अन्नपदार्थ हाताळणाऱया व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करावी. वैयक्तीक स्वच्छता राखा
– लॉकडाऊनच्या काळात अन्न व्यावसायिकांनी चांगल्या दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री करावी.
– मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री करू नका
– नाशवंत अन्नपदार्थ फ्रीजमध्ये योग्य तापमानात साठवावे. त्याचे सेवन चोवीस तासांच्या आत करण्याबाबत ग्राहकांना सुचना द्याव्यात
– या कालावधीत फक्त परवानाधारक-नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच अन्न पदार्थांची खरेदी करावी. पक्की बिले घेऊन त्याची बिले जतन करून ठेवा
– या सुचनांचे पालक न केल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करण्याचा इशारा