केसगळती रोखण्यासाठी मोहरीच्या तेलात या गोष्टी मिसळून बघा, केस होतील काहीच दिवसात घनदाट

सकाळी केस विंचरताना केस गळती व्हायला लागल्यावर, आपल्याला डोक्यावर टक्कल पडण्याची भीती भेडसावू लागते. अनेकदा तर केस धुतल्यानंतर केसगळतीचे प्रमाण सर्वाधिक वाढते. केसांसाठी आपण काही घरगुती उपाय केल्यास, आपली केसगळती थांबण्यास मदत होईल. असेच काही घरगुती उपाय आपण बघुया.

बहुगुणी कोरफडचे गुणधर्म जाणून तुम्हीही व्हाल थक्क, वाचा

मोहरीचे तेल आणि मेथीचे दाणे

मेथीचे दाणे प्रथिने आणि लोहाने समृद्ध असतात. मोहरीच्या तेलात उकळून लावल्यास ते टाळूला पोषण देतात आणि केस गळती नियंत्रित करण्यास मदत करतात.

मोहरीचे तेल आणि कढीपत्ता

कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे अकाली पांढरे होणे टाळण्यास आणि केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करतात. हे मिश्रण नैसर्गिक केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम मानले जाते.

दररोज एक पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत खास फायदे, जाणून घ्या

मोहरीचे तेल आणि कांद्याचा रस

कांद्याच्या रसात सल्फर भरपूर प्रमाणात असते. यामुळे कोलेजन उत्पादन वाढवून नवीन केसांची वाढ करण्यास मदत करते. मोहरीच्या तेलात कांद्याचा रस मिसळून लावल्याने केसांना नवसंजीनी मिळते.

मोहरीचे तेल आणि कडुलिंबाची पाने

कडुलिंबाच्या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. यामुळे आपल्या केसातील कोंडा दूर होतो. मोहरीच्या तेलात कडुलिंबाची पाने उकळून लावल्याने डोक्यातील कोंडा दूर होतो आणि केस निरोगी होतात.

पांढरे केस काळे करायचे असतील तर… हे करून पहा

मोहरीचे तेल आणि कोरफड जेल

कोरफड जेल केसांना खोल कंडिशनिंग देते आणि कोरडेपणा दूर करते. मोहरीच्या तेलात कोरफडीचे तेल मिसळून ते केसांसाठी मॉइश्चरायझर म्हणून काम करते. यामुळे केस मऊ आणि चमकदार राहतात.

लावण्याची योग्य पद्धत:

प्रथम, मोहरीचे तेल थोडेसे गरम करा.

वर नमूद केलेले कोणतेही घटक त्यात मिसळा आणि मसाज करा.

कमीत कमी १ तास किंवा रात्रभर तसेच राहू द्या.

दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूने धुवा.

आठवड्यातून दोनदा ही पद्धत अवलंबल्याने केस मजबूत होणे आणि केस गळणे या दोन्हीमध्ये लक्षणीय फरक दिसून येईल.