Skin Care – उत्तम त्वचेसाठी आपल्या आहारात हे पदार्थ समाविष्ट करायलाच हवेत, वाचा

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपला आहारही तितकाच निरोगी हवा. म्हणूनच आहार घेताना अतिशय काळजीपूर्वक घ्यायला हवा. निरोगी त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये काही महत्त्वाचे पदार्थ समाविष्ट करणे गरजेचे आहे. यामध्ये अनेक विविध फळांचा समावेश करुन आपण आपली त्वचा निरोगी ठेवू शकतो.

तुमच्या किचनमधील ‘ही’ वस्तू सौंदर्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

डाळिंब
डाळिंब हे त्वचेसाठी एक सुपरफूड मानले जाते. त्यात व्हिटॅमिन सी आणि प्युनिकलागिन असते. यामुळे कोलेजन वाढण्यास मदत होते. डाळिंब त्वचेला यूव्ही नुकसानापासून देखील वाचवते आणि रंगद्रव्य कमी करते. शिवाय, त्यात असलेले एलाजिक अॅसिड ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून त्वचेचा रंग एकसमान ठेवण्यास मदत करते.

नारळ पाणी आणि मलाई
नारळ पाणी हे एक नैसर्गिक हायड्रेटर आहे. त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात. यामुळे आपले शरीर आणि त्वचा हायड्रेट राहते. नारळाच्या क्रीममधील एमसीटी त्वचेची लवचिकता आणि नैसर्गिक चमक वाढवतात.

नाभीमध्ये तूप घालण्याचे आश्चर्यकारक फायदे, महिलांनी हा उपाय करुन पाहायला हवा

कोरफड जेल
कोरफडीचे नियमित सेवन किंवा वापर केल्याने त्वचा मऊ मुलायम होण्यास मदत मिळते.

पिस्ता
पिस्ता केवळ स्वादिष्टच नाही तर त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर देखील आहे. त्यात व्हिटॅमिन ईचे प्रमाण चांगले असते. यामुळे त्वचा तरुण आणि तेजस्वी दिसते. म्हणूनच दररोज नाश्त्यामध्ये पिस्ता खाल्ल्यास त्वचेसोबत आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

जाणून घ्या आहारात कोथिंबीर का असायला हवी? वाचा

केशर
केशर हे त्वचा उजळवण्यासाठी एक नैसर्गिक टॉनिक मानले जाते. त्यात क्रोसिन आणि सॅफ्रानल सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो, तसेच त्वचेला निरोगी आणि नैसर्गिक चमक मिळते.

त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी, चमकदार आणि तरुण दिसावी असे वाटत असेल, तर दैनंदिन आहारात या घटकांचा समावेश नक्की करा.