
नितळ, मऊ, अॅंटिपिगमेंटेड, ऑईल फ्री त्वचा हल्ली सर्वांनाच हवी असते. मग तो स्त्री असे वा पुरूष, यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. साध्या बेसन पासून ते अगदी कोरियन पद्धतीपर्यंत.. हल्ली बऱ्याच लोकांना कोरियन लोकांसारखी त्वचा हवी असते. चमकदार, नितळ आणि तजेलदार. यासाठी बरेच लोक कोरियन पद्धती वापर करतात.
निरोगी राहण्यासाठी ‘या’ एका पदार्थाचा समावेश आपल्या आहारात रोज असायलाच हवा, वाचा
कोरियन स्किन केअर पद्धतीमध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर खासकरुन केला जातो. तांदळात अॅंटीऑक्सीडेंट असल्यामुळे त्वचे वरच्या सुरकुत्या कमी करुन त्वचेला ग्लोईंग बनवतात. आणि आता त्यांची हीच पध्दत जगभर प्रसिध्द झाली आहे.
पण आपण आपल्या देशी पध्दतीमुळे सुद्धा आपण कोरियन त्वचा मिळवू शकतो. ते कसे, जाणून घेऊयात
हिंदुस्थानी त्वचा कोरियन त्वचेपेक्षा जाडी असते. त्यामुळे आपल्याला आठवड्यातून निदान २ -३ वेळा तरी तांदळाचे पाणी वापरले पाहिजे. ज्या लोकांची स्कीन सेंसिटीव्ह असते त्यांनी याचा वापर टाळावा.
कोरफड
कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.त्यातील अॅंटी बॅक्टीरीयल गुण त्वचेला ओलावा देण्यास मदत करतं. कोरफड मुळे त्वचेतील कोलेजन वाढते आणि स्किन डागरहीत मऊ होते.
काकडी
काकडी त्वचेला ओलावा देण्यास मदत करतं. त्वचेला आलेली सूज कमी करतं. विशेषत: कोरडी त्वचा असणाऱ्या लोकांना याचा वापर फायदेशीर आहे. याचा वापर कोरियन लोक सुध्दा आपल्या skin care मध्ये करतात.
ग्रीन टी मध्ये अॅंटाऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेवरची सूज कमी होऊन त्वचेला चमकवण्यास मदत करते. ज्यांची त्वचा तेलकट किंवा कोरडी असते, त्यांनी याचा वापर नक्की करावा.