बिग बॉसच्या ‘या’ स्पर्धकावर आऊ नाराज, फिनालेमध्ये सोबत परफॉर्म करायला दिला नकार

45

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉसच्या घरात दररोज कुणा ना कुणाचे वाद होतच राहायचे. काही वाद इतक्या टोकाला गेले की प्रेक्षकांना ते चांगलेच लक्षात राहले असतील. यातील एक वाद म्हणजे पत्रकार अनिल थत्ते आणि आऊ उषा नाडकर्णी यांचा. थत्ते बाहेर पडले तेव्हा त्यांनी आऊ या मोठ्या बहिणीसारख्या असल्याचे म्हटले होते. मात्र अद्यापही या दोघांमध्ये विस्तव जात असल्याचे समोर आले आहे. बिग बॉसच्या फिनालेमध्ये आऊंना थत्तेंसोबत परफॉर्म करायची ऑफर कलर्स वाहिनीने दिली होती. मात्र आऊंनी त्यास थेट नकार कळविला आहे.

anil-thatte-big-boss

बिग बॉसच़्या पहिल्या दिवसापासून आऊ आणि थत्तेंमध्ये वाद होत होते. घरात आऊंची खोड काढून त्यांना थत्तेंनी प्रचंड सतवले होते. कधी आखाड सासू, तर कधी आऊ ऐवजी काऊ काऊ म्हणून हिणवायचे. मात्र जेव्हा थत्ते घराबाहेर पडले त्यावेळी त्यांनी आऊ त्यांच्या मोठ्या बहिणीसारख्या असून प्रत्येक भाऊबीजेला जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र घरातून बाहेर आल्यानंतर थत्तेंनी पुन्हा आऊंवर टीका केली होती. अकराव्या आठवड्यात आऊ घराबाहेर आल्यानंतर त्यांना जेव्हा थत्तेंची ही वक्तव्य समजली तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

येत्या रविवारी बिग बॉसचा फिनाले आहे, या फिनालेसाठी सर्व आजी माजी स्पर्धक परफॉर्म करणार आहेत. त्यासाठी उषा नाडकर्णी यांना देखील अनिल थत्ते यांच्यासोबत परफॉर्म करण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनी थत्तेंसोबत परफॉर्म करायला नकार दिल्याचे उषा नाडकर्णी यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ‘घरातून बाहेर जाताना माझ्याशी गोड गोड बोलणारे थत्ते माझ्याबाबत घराबाहेर पुन्हा चुकीचं बोलत होते. मला माझ्या आईवडीलांनी एक चांगला भाऊ दिलाय, त्यामुळे थत्तेंसारखा भाऊ मला अजिबात नकोय’ , असे उषा नाडकर्णी यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या