मोबाईलच्या व्यसनामुळे लहान वयात गर्भाशयाचे दुखणे!

 

सध्याच्या युगात लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे वेड लागलेय. लोक तासन्-तास मोबाईल पाहतात. मात्र मोबाईलचे व्यसन मोठय़ांप्रमाणे  लहानग्यांच्या  आरोग्यासाठी देखील हानीकारक आहे. एका सर्वेक्षणानुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये आरोग्याबाबत अनेक समस्या निर्माण होत आहेत, त्यातील एक म्हणजे गर्भाशयातील वेदना (सर्वाइकल पेन). यावर वेळीच उपाय केला नाही तर वाढत्या वयाबरोबर समस्या गंभीर बनू शकते. अनेकदा पालक लहान मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्या हातात  मोबाईल देतात. मुलंही तासन्-तास मोबाईल घेऊन बसतात. त्यांचे खाण्यापिण्याकडे लक्ष नसते. असे करणे म्हणजे नकळत तुम्ही मुलांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांकडे ढकलणे.

 

– मोबाईलच्या व्यसनामुळे लहान मुलांना होणारे आजार साथीचे रूप धारण करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे गर्भाशयाचे दुखणे. यापूर्वी 50 वर्षांनंतर  गर्भाशयाच्या वेदनेची समस्या दिसून यायची. परंतु, जीवनशैलीत बदल झाल्यानंतर तरुण आणि लहान मुलांमध्येही ही समस्या दिसून येत आहे.

-मुलाला नेहमी थकवा जाणवत असेल, किंवा डोकेदुखी वा पाठदुखी असेल. तसेच मूल चिडचिड आणि आक्रमक वर्तन करत असेल तर वेळीच सावध व्हा.

 

कोणते आजार

– अधू दृष्टी

– मायोपिया रोग

– जास्त वजनाची समस्या

– ऑटिझम विचार करण्याची आणि बोलण्याची क्षमता कमी

– गर्भाशयातील वेदना

-जन्मानंतर सामान्य मुलांपेक्षा उशीरा बोलणे