उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक!

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. रविवारी पार पडलेल्या महाअंतिम सोहळय़ात आरोही प्रभुदेसाई, उत्कर्ष वानखेडे, शुभम सातपुते, संज्योती जगदाळे, नवाब शेख आणि कल्याणी गायकवाड या सहा स्पर्धकांमध्ये चुरशीचा सामना रंगला. यात उत्कर्ष वानखेडे याने राजगायक होण्याचा मान पटकावला. उत्कर्षला दोन लाख रुपये, सुवर्ण कटय़ार, कश्मीर टूर आणि इलेक्ट्रिक स्कूटर बक्षीस म्हणून मिळाली. संज्योती जगदाळे ठरली पहिली उपविजेती तर आरोही प्रभुदेसाई दुसरी उपविजेती ठरली. कल्याणजी-आनंदजी या जोडीतील आनंदजी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.