यूपीमध्ये 10 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; सिगारेटने चटके दिले, खिळे ठोकून डोळे काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश पुन्हा एकदा हादरले असून कानपूरमध्ये 10 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आले आहे. पोलिसांना मुलाचा मृतदेह नग्नावस्थेमध्ये सापडला असून मृतदेहावर सिगारेटचे चटक्यांच्या खुणा दिसून आल्या आहेत. धक्कादायक म्हणून मुलाचे डोळे अक्षरश: खिळे ठोकून काढण्यात आल्याचो समोर आले आहे. मुलाचा मृतदेह पाहून पंचनामा करण्यासाठी पोहोचलेले पोलीसही सुन्न झाले आहेत, त्यांच्याही काळजाचा थरकाप उडाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. मंगळवारी त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला. पीडित मुलाचा मृतदेह नग्नावस्थेत आणि छिन्नविछिन्न केलेला होता. मृतदेहावर सिगारेटने चटके दिल्याच्या खुणाही दिसून आल्या असून जवळच रक्ताने माखलेले खिळेही सापडले आहेत. तसेच पीडित मुलाच्या गळ्यावर बुटाचेही निशाण आहे. आरोपींनी मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याच्या गळ्यावर पाय ठेवून नंतर डोळे खिळ्यांनी काढल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांना घटनास्थळी दारुची बाटली आणि दोन ग्लासही सापडले आहेत. यावरुन दोन आरोपी असावेत आणि दारु प्यायल्यानंतर अल्पवयीन मुलाची हालहाल करुन हत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच मुलाची अधिकाधिक तडफड व्हावी म्हणून त्याच्या चेहऱ्यावर आणि शरिरावर नराधमांनी सिगारेटचे चटकेही दिले. हत्येनंतर मुलाला जमिनीवरून ओढत नेल्याच्याची खुणा येथे आढळून आल्या.

कानपूरचे एसपी अजित कुमार सिन्हा यांनी मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नराधमांनी त्याच्या शरिरावर अनन्वित अत्याचार केल्याचेही स्पष्ट झाले आहेत. त्यांनी एवढा क्रूरतेने तिची हत्या का केली हे आरोपींना पकडल्यावरच स्पष्ट होईल असेही सिन्हा यांनी सांगितले.

कुटुंबियांचा गंभीर आरोप

या प्रकरणामध्ये पोलिसांनी बेजबाबदारपणाही समोर आला असून मुलाच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केला आहे. सोमवाराी मुलगा बेपत्ता झाल्यानंतर आम्ही पोलीस स्थानकात गेलो होते, परंतु पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याऐवजी दोन दिवसांनी येण्यास सांगितले. परंतु दोन दिवसांनी मुलाचा मृतदेहच सापडला, असे कुटुंबियांनी सांगितले. दरम्यान, सध्या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.