
उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. तुफैल मकबूल आलम असे त्या व्यक्तीचे नाव असून तो गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानी सैन्यातील एका अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत संपर्कात होता. तसेच त्याच्या फोनमधून पाकिस्तानातील सहाशेहून अधिक नंबर एटीएसला सापडले आहेत. एटीएसनं तुफैलला वाराणसीतील आदमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नवापूर दोशीपुरा येथून अटक करण्यात आली.
तुफैलच्या व्हॉट्सअपमध्ये पाकिस्तानमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना साद रिझवीचे व्हिडिओ आढळले आहेत.तसेच गझवा ए हिंद, बाबरी मशिदचा बदला, देशात शरियक कायदा असे संदेश पाठवून तो लोकांची डोकी भडकवायचे काम करायचा. तुफैल यासंबंधी व्हिडिओ इतर व्हॉट्सअपमध्ये शेअर करत होता.