
उत्तर प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 9 जणांचा मत्यू झाला आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.
9 people killed, 27 injured in collision between a truck and a passenger bus in Barabanki. The injured have been shifted to Trauma Centre, says DM Barabanki. pic.twitter.com/WqaMlPyBEv
— ANI UP (@ANINewsUP) October 7, 2021
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात पहाटे पाऊणे पाचच्या सुमारास एका बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात बसचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर ३० जण जखमी झाले असून अनेक प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.



























































