
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिक-अश्रफच्या हत्येनंतर प्रथमच माफियांवर भाष्य केले आहे. आता कोणताही गुंड वा माफिया कुणालाही धमकावू शकत नाही, असे योगींनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश तुम्हाला चांगल्या कायदा व सुव्यवस्थेची खात्री देतो, असे योगी म्हणाले. दरम्यान, राज्यात 2017 पूर्वी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अतिशय वाईट होती. दंगलींमुळे राज्य बदनाम होते. अनेक ठिकाणी लोक माफियांच्या नावाने घाबरायचे. मात्र आज लोकांनी या माफियांच्या नावाने घाबरण्याची गरज नाही, असे योगी म्हणाले.


























































