अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा

उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सात महिन्यांपूर्वी या आरोपीने हे क्रूर कृत्य केले होते.

या नराधमाने हत्या केल्यानंतर मुलीचा चेहरा ऍसिडने जाळला होता. त्याला अटक झाल्यानंतर न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती. 6 मार्च रोजी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते.

मुलीसोबत झालेल्या क्रूर कृत्यानंतर प्रचंड जनआक्रोश व्यक्त केला जात होता. त्यावेळी लोकांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत रस्त्यावर आंदोलन केले होते. तपासणीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात सुमारे सात महिने सुनावणी झाल्यानंतर सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवि यादव यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.

आपली प्रतिक्रिया द्या