
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच गोरखपूरच्या दौऱ्यावर होत्या. भाजपने ठिकठिकाणी पोस्टर लावून त्यांचे स्वागत केले. हे पोस्टर लावताना देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदाचा साधा सन्मानही राखला गेला नाही. मुर्मू यांचे पोस्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटआउटखाली झळकत होते. मोदींच्या उंच उंच प्रतिमेपुढे द्रौपदी मुर्मू यांना एक प्रकारे ‘कट आणि आउट’ करण्यात आले होते.