भगवे वस्त्र घातल्याने उडवली टिंगल, पुजाऱ्याची निर्घृण हत्या; उत्तर प्रदेशमधील संतापजनक घटना

2374

उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे भगवान शंकराच्या मंदिरात पुजाऱ्याचे काम करणाऱ्या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मेरठमधील भावनपूर येथील अब्दुलापुर बाजार भागात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

वृत्तानुसार, अब्दुलापुर बाजार भागात एक शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात कांती प्रसाद नावाचे गृहस्थ पुजाऱ्याने काम करायचे आणि ते मंदिर समितीचे उपाध्यक्ष होते. कांती प्रसाद नेहमी गळ्यात भगवे वस्त्र आणि अंगात पिवळे वस्त्र घालायचे. सोमवारी ते गंगानगर येथे वीजबिल भरण्यासाठी गेले होते. वीजबिल भरून परत येत असताना अनस कुरेशी उर्फ जानलेवा याने भगव्या वस्त्र घातल्यावरून त्यांची आधी टिंगल उडवली आणि धार्मिक टीकाटिप्पणी केली.

कांती प्रसाद यांनी याचा विरोध केला असता आरोपीने भर रस्त्यात त्यांना मारहाण केली. गावी आल्यावर त्यांनी अनस याचे घर गाठत तक्रार केली. मात्र तिथेही अनस आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. याची माहिती मिळताच लोकांनी तिथे धाव घेत कांती यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी अनस याच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी, मारहाण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हिंदू संघटनांनी आक्रमक रूप घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस अधिकारी संजय कुमार यांनी यास दुजोरा दिला असून तणाव कमी करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या