
उत्तर प्रदेशमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर एका नराधमाने बलत्कार केल आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील ही घटना आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी त्यांच्या शेजारीच राहतो. त्याचे नाव पवन असून 18 फेब्रुवारी रोजी त्याने काही कामानिमित्त घरी बोलवले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीने झालेली घटना घरी सांगितली. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी पोक्सो अंतर्गत कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तिची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.




























































