उन्नाव प्रकरण: पीडितेला रुग्णालयातून डिचार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्नाव बलात्कार आणि घातपात प्रकरणातील पीडितेला एम्स रुग्णालयातून आज डिचार्ज देण्यात आला. आता ती कुटुंबासह दिल्लीत राहणार आहे. अत्यवस्थ असलेल्या पीडितेवर गेले काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उत्तर प्रदेशातील उन्नावचे भाजप आमदार कुलदीप सेंगरवर तिने बलात्काराचा आरोप लावला होता. याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असतानाच तिला आणि तिच्या वकिलावर ट्रक घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. यात पीडिता आणि तिच्या वकिलाला गंभीर दुखापत झाली तर तिच्या काकांचा मृत्यू झाला. हा घातपात सेंगर यानेच घडवून आणला असा आरोप पीडितेने केला आहे. पीडिता आणि आरोपींचा जबाब नोंदवण्यासाठी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्येच तात्पुरते न्यायालय आले होते.