Uttarakhand CloudBurst : काही क्षणात झाले होत्याचे नव्हते, ढगफुटीनंतरचा धक्कादायक फोटो आला समोर

उत्तराखंडमधील मुखवा जवळील धराली गावात ढगफुटी झाली असून अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण गावात होत्याचे नव्हते झाले. या गावाचा ढगफुटी आधीचा व ढगफुटीनंतरचा फोटो प्रशासनाने शेअर केला असून ढगफुटीमुळे गावातील 80 टक्के घरे वाहून गेल्याचे दिसून येत आहे.

ढगफुटी आधीच्या फोटोत नदी पात्राच्या दोन्ही बाजूला भरपूर घरे दिसत आहेत. तर ढगफुटीनंतरच्या फोटोत डोंगर-कपारीतून पाण्याच्या मोठ्या लोंढ्यासह चिखल वाहून आल्याचे दिसत असून या चिखलामुळे तेथील बहुतांश घरे उद्धवस्त झाली आहेत.

चार ठार 50 बेपत्ता

ढगफुटीनंतर काही वेळातच एनडीआरएफ व लष्कराच्या जवानांनी या भागात बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत येथून 4 जणांचे मृतदेह हाती लागले असल्याचे समजते. तर 50 हून अधिक लोकं बेपत्ता आहेत. मात्र एकंदरीत फोटोवरून जी परिस्थिती दिसतेय त्यात हा आकडा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आह.े