दीपशिखा – उत्तरेचा आकांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जयश्री संगीतराव << [email protected]  >>

उत्तरा ही विराट राजाची लाडकी कन्या. जी आपल्या पित्यासाठी जन्मापासूनच भाग्याची ठरली. रूपाने, गुणाने आणि कर्तृत्वाने संपन्न अशी राजकन्या असूनही तिच्या वागण्यात, बोलण्यात अतिशय अदब आणि सन्मान दिसून येतो. वेळोवेळी तिच्या या गुणांचे दाखले आपल्याला आढळून येतात. लहानपणी सांगितलेलं भविष्य खरं ठरत असताना कृष्णावरची तिची भक्ती, श्रद्धा तिच्या वागण्यातून दिसून येते. कुरूकुलाची स्नुषा होताना तिच्या मनाची झालेल घालमेल आणि तिने घेतलेला निर्णय तिच्याच भावभावनांमधून व्यक्त झाला आहे.

मी विराट राजाची लाडकी कन्या उत्तरा. बाबांना माझ्या रूपाचा नेहीमच अभिमान वाटायचा आणि माझ्या भाग्याचाही. ते कायम म्हणायचे, उत्तरा तू माझ्यासाठी जितकी भाग्याची ठरलीस ना त्याहीपेक्षा जास्त तुझ्या सासरच्यांसाठी राहणार आहेस. अर्जुनाने द्रौपदी स्वयंवर जिंकल्याचे सांगून ते कितीदा तरी ऐकवायचे, उत्तरे माझा जावई पण अर्जुनासारखाच पराक्रमी राहणार आहे. हे ऐकलं ना की माझं मन फुलपाखरासारखं बागडू लागायचं. सहज गंमत म्हणून एका ब्राह्मणाने माझं सांगितलेलं भविष्य, जे रहस्य मी माझ्या हृदयात बंद करून ठेवलं होतं. ते आठवलं की मन धडधडायला लागायचं. खरंच, आयुष्य कित गुंतागुंतचं असतं ना? किती घटना अशा घडतात ज्याची उकल लगेच होत नाही. सैरंध्रीच्या बाबतत बघा ना. बाबांनी माझ्या मदतीसाठी तिची ओळख करून दिली, त्यावेळी तिचं ते सोज्वळ सौंदर्य, चेहऱ्यावरचा करारीपणा, तेज, लांब मोकळा केशसंभार… मला सगळंच अवाक करत होतं. खरं सांगू, तिच्याकडून माझी सेवा करून घ्यायला मला रुचलंच नाही कधी… आणि बृहन्नडा, बाबांनी मला नृत्यकला शिकवण्यासाठी तिची खास नेमणूक केल होत. तिचं नृत्यकौशल्य अलौकिक होतं, पण तिच्या आवाजातला पुरुषीपणा आणि स्त्री असूनही तिच्यात नसलेला नाजूकपणा, हे सगळं बघितलं की काहीतरी यात वेगळं आहे असं माझं मन मला सांगायचं. ज्यावेळी पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात ते आपल्याच राज्यात अशा वेगळय़ा भूमिकेत, वेगळय़ा रूपात होते, हे मला कळलं तेव्हा तर मला काय बोलावं कळतच नव्हतं. एवढय़ा मोठय़ा साध्वीकडून आपण नकळत सेवा करून घेत होतो याच मला खंत वाटल. थोडी तरी त्यांच सेवा करून परतफेड कराव असं सारखं वाटू लागलं. माझ्या मनातल इच्छा कदाचित ईश्वराने ऐकलं असाव. माझा स्वीकार करावा, अश इच्छा बाबांनी वर्तवताच तात अर्जुनाने आपल्या पुत्र वधूच्या रूपात अभिमन्यूच पत्नी म्हणून माझा स्वीकार केला. माझं मन जणू आनंदाच्या झुल्यावर झुलायला लागलं.

पण माझं लहानपण वर्तवलेलं भविष्य आठवलं नि हृदयात चर्र… झालं. कुरुकुलाच्या आपण स्नुषा होणार. या कुलात पूर्ण सुख एकाही स्त्रीला मिळालं नाही. अगदी कुलमाता सत्यवतीपासून मातोश्री द्रौपदीपर्यंत. मग आपण? आपणही याच वाटेवर निघालोय, पण माझ्यातल्या क्षत्रिय कन्येने हे आव्हान स्वकारलं आणि अभिमन्यूची पत्नी म्हणून पदार्पण केलं. कौरव-पांडवात चाललेला ताणतणाव, सत्तेसाठी चाललेल भांडणं, मत्सर… मन हेलावून टाकत होतं. आपापसात युद्ध होऊ नये असं सुभद्रा मातेप्रमाणेच मलाही वाटत होतं. अखेर जे व्हायचं तेच झालं. युद्धाला तोंड फुटलंच. नाथ अभिमन्यूला रणांगणावर पाठवणार नाही असं तात धर्मराजाने माझ्या पित्याला वचन दिलं होतं, पण युद्धात सगळी वचनं, इच्छा त्याला अर्थच नसतो. तिथे महत्त्वाची असते वास्तविकता. कौरवांनी कपटाने चक्रव्यूहाची रचना केली. त्यावेळी अर्जुन दुसरीकडे युद्धात गुंतले होते. चक्रव्यूहाचा भेद फक्त तात अर्जुन आणि नाथ अभिमन्यू यांनाच ज्ञात होता. क्षत्रिय धर्माला शोभणारा पराक्रम अभिमन्यूने दाखवला. त्यांनी चक्रव्यूह भेदून आत प्रवेश केला. युद्धाच्या सगळय़ा वार्ता ऐकून मन धास्तावत होतं. माझं भविष्य मला आठवत होतं. अशुभाच्या सावल्या भेडसावत होत्या. अभिमन्यू कपटाने मारले गेल्याची वार्ता आली नि मी धास्तावले. तुझ्या पतीचा अकाल अकस्मात कपटाने मृत्यू होईल हे ब्राह्मणाचं भविष्य दुर्दैवाने खरं झालं होतं. माझं मन वेडपिसं झालं. पती निधनाचं दुःख करू की ब्राह्मणाचं दुसरं भविष्य खरं होऊ नये म्हणून धडपडू? कळत नव्हतं काय करू? कुठे लपवू स्वतःला? हे अघटित थोपवण्यासाठी सीतामाईसारखं पृथ्वी मला पोटात घेईल का? कसा वाचवू माझ्या उदरातला अंश? मन सैरभर झालं.

तेवढय़ात जोराचा वारा सुटला, धरणी कापायला लागल, विजा कडकडायला लागल्या. माझ्या उदरावर जबरदस्त आघात झाल्याचं मला जाणवलं. अश्वत्थामाने सोडलेल्या ब्रह्मास्त्राचा तो आघात होता. मला प्रसूती वेदना सुरू झाल्या. माझ्या दुर्दैवाने दुसरेही पाऊल उचललेच. माझं बालक मृत जन्माला आलं. माझ्या डोळय़ातले जणू अश्रूच आटले. मी बेभान होऊन भगवंत कृष्णाकडे धावले. भगवंता, भगवंता माझं पहिलं भविष्य खरं ठरलं, माझा पती गमावला. माझं दुसरं भविष्य खरं ठरू नये म्हणून मी धडपडत होते, पण तेही खरं ठरलं. तेही सहन केलं, पण माझं वर्तवलेलं तिसरं भविष्य मात्र खरं ठरावं म्हणून मी याचना करते. ते खरं व्हायलाच हवं. भगवंता हे खरं व्हायलाच हवं. जन्माला आलेलं माझं मृत बालक भगवान कृष्ण जिवंत करेल. हे माझं तिसरं भविष्य तुला खरं ठरवायचं आहे आणि ते तू करणार आहेस. कुरुकुलाचा हा एकुलता एक वंशज जीवित करायचा, की कुरूकुलाचा नाश उघडय़ा डोळय़ांनी बघायचा हे तुलाच ठरवायचं आहे. पण एक लक्षात ठेव, माझं भविष्य जर खोटं ठरलं तर खोटा तू ठरणार. साऱ्या जगाने मग कोणावर विश्वास ठेवायचा रे? या उत्तरेच्या मातृत्वाचा आकांत भगवंतापर्यंत पोहोचला. त्याच्या कृपेने माझं बाळ जीवित झालं. माझ्यासहित कुरुवंशाच्या एका डोळय़ात धारातर्थी पडलेल्यांसाठी अश्रू होते, तर दुसऱ्या डोळय़ात कुरुवंशाची वेल वाढणार म्हणून आनंद होता. मी मात्र आम्हा कुरुवंशाच्या नशिब आलेले दुर्भाग्य माझ्याबरोबर संपावे म्हणून भगवंताकडे आशेने बघत होते.