हिंदुस्थानात कोरोना साखळी तोडण्यासाठी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक-व्ही या तीन लसींना मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱया डोसची एकूण संख्या 23 कोटी 13 लाख 22 हजार 417 वर पोहोचली आहे. आयसीएमआरच्या माहितीनुसार देशात दररोज 20 लाखांच्या सरासरीने कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत 36 कोटी 47 लाख 46 हजार 522 जणांची तपासणी पूर्ण झाली आहे, तर दिवसभरात 20 लाख 36 हजार 311 जणांची चाचणी करण्यात आली. 24 तासांत देशात 1 लाख 14 हजार 460 नवे रुग्ण तर 1 लाख 89 हजार 232 जण कोरोनामुक्त झाले.


























































