वडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुखांच्या ‘80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण’ या धोरणानूसार बीड जिल्ह्यात शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भगवा सप्ताह’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यात ‛भगवा सप्ताह’ राबविण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याच सप्ताहानिमित्त वडवणी तालुक्यातील काडी वडगाव येथील कडाक्याच्या थंडीत काम करनाऱ्या ऊसतोड मजुरांना सोमवारी सकाळी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा संघटक योगेश नवले, माऊली गोंडे, बालासाहेब बादाडे, दिनेश जाधव, हनुमंत शिंदे, पत्रकार लंगे , सरपंच बाळासाहेब राऊत, दत्ता गोंडे, शिवाजी गोंडे, दीपक सावंत आदी उपस्थित होते. ऊसतोड मजुरांना कडाक्याच्या थंडीतही काम करावे लागत आहे. त्यांच्या थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने त्यांना ब्लँकेटचे वाटप करत शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.