
नववीतली एक मुलगी टॅबवर अभ्यस करण्या ऐवजी सारखी युट्युबवर व्हिडीओ पहायची. त्यामुळे वडिलांनी तिचा टॅब हिसकावून घेतला. याचा राग मनात धरून नववीच्या मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्येची धमकी दिली आहे. गुजरातच्या वडोदरा शहरातील ही घटना असून मुलीला कसेबसे समजवून तिला खाली उतरवण्यात आले आहे.
सध्या कोरोना काळात अनेक ठिकाणी शाळा कॉलेज बंद आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवले जातून विद्यार्थी मोबाईल आणि टॅबच्या माध्यमातून अभ्यास करत आहेत. वडोदरा शहरात एक मुलगी तासन तास टॅबवर युट्युबवर व्हिडीओ पहायची. त्यामुळे मुलीचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते. वडिलांनी अनेक वेळा समजावूनही मुलीने अभ्यासाकडे लक्ष दिले नाही. वडिलांनी मुलीकडून टॅब हिसकावून घेतला.
याचा राग मनात धरून मुलगी घराबाहेर पडली आणि जवळच असलेल्या पेट्रोल पंपच्या इमारतीजवळ गेली. तिच्या वडिलांनी तिचा शोध घेतला असती ती इमारतीजवळ उभी असल्याचे त्यांना दिसले. वडिलांना पाहताच मुलगी इमारतीत गेली आणि खाली उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागली. उपस्थित नागरिकांनी तत्काळ पोलिसांना बोलवले. पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अखेर मुलीची कशीबशी समजूत काढून तिला खाली बोलवले आणि अनर्थ टळल्याने सगळ्यानी सुटकेचा निःश्वास सोडला.


























































