
मुंबई महापालिका निवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत आघाडी केली आहे, परंतु मुंबईत काँग्रेसविरोधात तीन उमेदवार दिल्याची माहिती समोर आली आहे. आग्रह केलेल्या जागा देण्यास काँग्रेसने नकार दिल्यानंतर वंचितने काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांची डोकेदुखी वाढवली आहे. ज्या 16 जागांचा वंचितचा आग्रह काँग्रेसने नाकारला होता, त्यापैकी तीन जागांवर वंचितने उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत.
140 मानखुर्द-शिवाजी नगर, वॉर्ड क्रमांक 116 आणि वॉर्ड क्रमांक 133 काँग्रेसने महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला सोडला होता. त्या ठिकाणी वंचितने सुप्रिया जाधव यांना उमेदवारी दिली आहे. वॉर्ड क्रमांक 181 मध्ये कमलेश यादव यांच्या विरोधात अजिंक्य पगारे यांना मैदानात उतरवले आहे.






























































